चीनच्या पूर्व भागातील ग्रामीण भागात जन्मलेला वांग तीयानफांग हा एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे. त्याला बघून तुम्हाला धक्काच बसेल. वान्ग चा जन्म 1987 मध्ये चीनमध्ये झाला आहे, पण जन्मानंतर दोन वर्षांनी त्याची शारीरिक उंचीच खुंटली. वांग ह्यांचे वय आजघडीला 30 वर्षे आहे. पण शरीर, विचारशक्ती, वागणे, बुद्धी अजून हि 2 वर्षांच्या मुलांसारखीच आहे. त्याला नीट बोलताही येत नाही हे विशेष. वांगची एकूण शारीरिक उंची फक्त 2 फुट 7 इंच एवढीच आहे. शारीरिकच नव्हे तर त्याचा मानसिक विकासही झाला नाही. त्याच्या शरीराची वाढ होणे थांबले तेव्हा लोकांनी त्याच्या पालकांना त्याला एखाद्या मंदिरात किंवा रस्त्यावर सोडून देण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्याच्या आईने ना त्याला सोडले ना दुसरे मुल होवू दिले. शारीरिक असमर्थतेमुळे वांगची 24 तास काळजी घ्यावी लागते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews